Service Alert
Le service CD se termine le 31 juillet 2024
Les abonnés auront jusqu’à la fin de la journée le 15 juillet pour faire demande pour des CD. Le CAÉB cessera la production et l’envoi de CD à compter du jeudi 31 juillet.
Les abonnés auront jusqu’à la fin de la journée le 15 juillet pour faire demande pour des CD. Le CAÉB cessera la production et l’envoi de CD à compter du jeudi 31 juillet.
Articles 1 à 5 sur 5
Par Dada Bhagwan. 2016
कर्म म्हणजे काय ? चांगली कर्मे वाईट कर्मांना धूऊ शकतात का ? चांगली माणसे दुःखी का असतात? कर्मबंधन होणे कसे…
थांबवायचे ? कर्मामुळे कोण बंधनात आहे, शरीर की आत्मा ? जेव्हा आपली सर्व कर्म संपतात तेव्हा आपला मृत्यू होतो. हे सारे जग म्हणजे दुसरे काही नाही, फक्त कर्माचा सिद्धांत आहे. बंधनाचे अस्तित्व पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे, त्यासाठी तुम्ही स्वतःच जबाबदार आहात. तुमच्या समोर जे काही येते त्याचे चित्रण तुम्हीच केलेले आहे; त्यासाठी इतर कोणी जबाबदार नाही. अनंत जन्मांसाठी ‘संपूर्णपणे फक्त’ तुम्हीच जबाबदार आहात. परम पूज्य दादाजी सांगतात कर्माची बीजे पूर्व जन्मात पेरली गेली होती आणि त्याची फळे या जन्मात मिळतात. त्या कर्मांची फळे कोण देतो? देव ? नाही. फळे निसर्ग किंवा आपण ज्याला ‘सायंटिफिक सरकमस्टेन्शियल एविडेन्स’ म्हणतो, तो देतो. परम पूज्य दादाश्रींनी आपल्या ज्ञानाद्वारे कर्मांचे विज्ञान जसेच्या तसे उघड केले आहे. अज्ञानातेमुळे कर्म भोगतेवेळी राग-द्वेष होतात, त्यामुळे नवीन कर्मे बांधली जातात, जी मग पुढील जन्मात परिपक्व होतात आणि भोगावी लागतात. ज्ञानी नवीन कर्मबंधन होण्याचे थांबवितात. जेव्हा सर्व कर्मे पूर्णपणे संपतात, तेव्हा मोक्ष प्राप्ती होते.Par Dada Bhagwan. 2016
अनादि काळापासून जगाची वास्तविकता जाणण्यासाठी मनुष्य प्रयत्नशील आहे. परंतु तो खरे काय ते जाणू शकलेला नाही. मुख्यतः वास्तविकतेत, ‘मी कोण…
आहे ? या जगाला चालविणारा कोण आहे? तसेच जगाचा रचनाकार कोण आहे ?’ हे जाणून घ्यायला हवे. प्रस्तुत संकलनात खरा कर्ता कोण आहे, हे रहस्य उघड केले आहे. सामान्यतः काही चांगले झाले तर ‘मी केले’ असे तो मानतो आणि वाईट झाले तर दुसऱ्यावर आक्षेप घेतो की ‘त्याने बिघडविले.’ नाही तर ‘माझी ग्रहदशा बिघडली आहे’ असे बोलतो, किंवा ‘देवाने केले’ असा आरोप पण करतो. या सर्व राँग बिलीफस् (चुकीच्या मान्यता) आहेत. देव काय असा पक्षपात करणारा आहे का, की तो आपले नुकसान करील ? हे जग कोणी बनविले ? जर कोणी बनविणारा असेल तर मग त्याला कोणी बनविले? मग त्या बनविणाऱ्याला कोणी बनविले ? म्हणजे या गोष्टीचा अंतच नाही. आणि दुसरा असाही प्रश्न पडतो की, जर त्याला जग बनवायचेच होते तर त्याने असे जग का बनविले की ज्यात सर्व दुःखीच आहेत ? कोणीच सुखी नाही ? म्हणजे त्याची मौज आणि आमची शिक्षा, हा कसला न्याय? या काळात कर्त्या संबंधीचा सिद्धांत पहिल्यांदाच विश्वाला यथार्थपणे परम पूज्य दादा भगवानांनी दिला आहे, आणि तो असा आहे की जगात कोणीही स्वतंत्र कर्ता नाही. या जगाला रचणारा किंवा चालविणारा कोणीही नाही. हे जग सायंटिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्सने चालत आहे. ज्याला परम पूज्य दादाश्री ‘व्यवस्थित शक्ती’ असे म्हणतात. जगात कोणीही स्वतंत्र कर्ता नाही, परंतु सगळे नैमित्तिक कर्ता आहेत, सगळे निमित्त आहेत. गीतेत पण श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते, हे अर्जुना! तू युद्धात निमित्तमात्र आहेस, तू युद्धाचा कर्ता नाहीस. प्रस्तुत पुस्तिकेत कर्ता कोण, याचे रहस्य परम पूज्य दादाश्रींनी साध्या सरळ भाषेत, हृदयात उतरेल अशा प्रकारे समजावून सांगितले आहे.Par Dada Bhagwan. 2016
तुम्ही जीवनात होणाऱ्या क्लेशांपासून थकून गेला आहात का? आणि चकित आहात की हे नवीन क्लेश कुठून बरे उत्पन्न होतात? क्लेश…
रहित जीवनासाठी तुम्हाला फक्त पक्का निश्चय करायचा आहे की लोकांसोबत असलेला व्यवहार तुम्ही समताभावे पूर्ण कराल आणि तेही त्यात यश मिळेल की नाही याची चिंता केल्याशिवाय. मग एक दिवस तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच शांती लाभेल. जर बायको-मुलांसोबत अधिक गुंतागुंतीचे कर्म असतील तर त्यांचा निकाल करण्यात जरा जास्त वेळ लागतो. जवळच्या माणसांसोबत असलेला गुंता हळूहळू संपुष्टात येतो. चिकट कर्मांचा निकाल करतेवेळी तुम्हाला अतिशय जागृत राहावे लागेल. जर तुम्ही निष्काळजीपणा आणि आळस दाखवलात तर हा सर्व गुंता सोडवण्यात तुम्हाला अपयश मिळेल. जर कोणी तुम्हाला कटू शब्द बोलला आणि त्यावर तुमचीही जर कटू वाणी निघाली तरीही तुमच्या बाहेरील व्यवहार इतका महत्वपूर्ण नाही कारण तुमची घृणा समाप्त झाली आहे आणि तुम्ही समभावे निकाल करण्याचा दृढ निश्चय केलेला आहे. च्च्बदला घेण्याच्या सर्व भावनांपासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला परम पूज्य दादाश्रींकडे येऊन ज्ञान घेतले पाहिजे. मी तुम्हाला मुक्त होण्याचा रस्ता दाखवेल. जीवनात थकलेली माणसे मृत्यूला का कवटाळतात? याचे कारण ते जीवनातील ताण-तनावाचा सामना करु शकत नाही. इतक्या अधिक ताण-तनावात तुम्ही किती दिवस जगू शकाल? किड्या-मुंग्याप्रमाणे आजचा मनुष्य निरंतर त्रासलेला आहे. मनुष्य जीवन मिळाल्यानंतरही कोणी दु:खी का असावे? संपूर्ण जग दु:खातच आहे आणि जो दु:खात नाही तो काल्पनिक सुखात हरवलेला आहे. या दोन टोकांमध्ये जीवत झुलत आहे. आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर तुम्ही सर्व कल्पना आणि दु:खांपासून मुक्त व्हाल.ज्ज् दादाश्रींच्या या पुस्तकात क्लेश रहित जीवन जगण्याच्या चाव्या आणि योग्यPar Dada Bhagwan. 2016
व्यवस्थित शक्ति के द्वारा हमारे जीवन का समस्त सांसारिक व्यवहार डिस्चार्ज हो रहा है। हमारी पाँचों इन्द्रियाँ कर्म के अधीन…
हैं। कर्मों के बंधन का कारण क्या है? यह धारणा की कि ‘मैं चंदुलाल हूँ’ वह कर्म बंधन का मूल कारण है। सिर्फ सच (तथ्य) जानने की आवश्यकता है। यह एक विज्ञान है। इस पुस्तक में परम पूज्य दादाश्री ने पाँच ज्ञान इन्द्रियों तथा उनके कार्यों की प्रणाली के बारे में बताया है। मन-बुद्धि-चित्त-अहंकार, यह सब इन्द्रियों के अलग-अलग कार्य हैं। फिर अपना कार्य करने में कौन असफल रहा? ‘स्व’ रहा। ‘स्व’ का कार्य है जानना, देखना और हमेंशा आनंदमय स्थिति में रहना। हर इन्सान ज़िंदगी के बहाव के साथ आगे बह रहा है। यहाँ कोई भी कर्ता नहीं है। अगर कोई स्वतंत्र कर्ता होता तो वह हमेंशा बंधन में ही रहता। जो नैमित्तिक कर्ता है वह कभी भी बंधन में नहीं रहता। संसार प्राकृतिक परिस्थितियों के प्रभाव से उत्त्पन्न परिणाम पर ही चलता है। ऐसी परिस्थिति में ‘मैं कर्ता हूँ’ की गलत धारणा की उत्पत्ति होती है। इस कर्तापन की गलत धारणा की वजह से अगले जन्म के बीज बोए जाते हैं। इस संकलन में परम पूज्य दादाश्री ने कर्म के विज्ञान, कर्तापन, पाँच इन्द्रियों, अहंकार, मनुष्यों का स्वभाव, ज्ञानियों के प्रति विनय, पापों का प्रतिक्रमण, प्रायश्चित इत्यादि विषयों के बारे में बताया है। यह समझ साधकों को स्वयं के बारे में व संसार में दूसरों से कैसे शांतिपूर्वक व्यवहार करें, इस बारे में मदद करती है।Par Dada Bhagwan. 2016
एकीकडे संसार व्यवहारात पदोपदी येणाऱ्या समस्या आणि दुसरीकडे आंतरिक संघर्षांशी झुंजणाऱ्या या काळाच्या मनुष्याला अंतरशांती कशी काय लाभेल? यातून सुटका…
कशी होईल? आपण पाहतो की कित्येकदा आपल्या बोलल्यामुळे समोरच्याला दुःख होत असते, तर कित्येकदा कोणी आपल्याला काही बोलले त्यामुळे आपल्याला दुःख होते, कधी वाटते आपल्याबरोबर अन्याय झाला आहे, तर कधी मनात शंका वाटत राहते, इतरांना दोषी पाहिले जाते... अशा परिस्थितीत समाधान कसे मिळवायचे? जीवन व्यवहार हे समस्यांचे संग्रहस्थानच आहे. एका समस्येचे निवारण झाले की दुसरी समस्या आ वासून उभीच असते. आपल्याला सतत अशा समस्यांचा सामना का करावा लागतो? स्वतःच्या कोणत्या चुकीमुळे आपण अनंतकाळापासून भटकत राहिलो आहोत? वास्तवात स्वतःजवळ आत्म्याचा परमानंद तर होताच पण स्वतः दैहिक सुखातच रममाण होता. ज्ञानी पुरुषांच्या कृपेमुळे आणि त्यानंतर स्व-पराक्रमाने ही चूक सुधारता येते. एकदा आत्मज्ञान झाले की अनंत समाधीसुख अनुभवास येते! तर चला, या अक्रम विज्ञानाद्वारे कर्म, बंधन, प्रतिक्रमण, वाणी, निसर्गाचे नियम... इत्यादीचे विज्ञान समजून घेऊया आणि त्या समजूतीने सांसारिक समस्यांना अगदी सहजपणे सोडवून परमानंद प्राप्तीकडे वळूया.