Tai Tai, Gadgadat Kuthun Hoto?
Résumé
लहान भावाकडे आपल्या ताईला विचारायला अनेक प्रश्न आहेत. त्याला माहीत आहे, ताईकडे सर्व उत्तरे आहेत, कारण ती नेहमी कोणते ना कोणते तरी जाडे पुस्तक घेऊन वाचत असते. या पुस्तकात छोट्या भावाला प्रश्न पडला आहे - गडगडाट कुठून होतो? आकाशातील रागावलेल्या… राक्षसाच्या गर्जनेमुळे होतो, की ढगात असलेल्या मोटारसायकलींच्या टोळीमुळे हा आवाज होतो? अर्थात शेवटी ताईकडे खरं उत्तर आहे, पण हे मजेदार पुस्तक वाचण्यापूर्वी तुम्ही सांगा : तुम्हाला काय वाटते, गडगडाट कुठून होतो?