
Ganit class 5 - Maharashtra Board: गणित इयत्ता पाचवी - महाराष्ट्र बोर्ड
Synthetic audio
Summary
गणित इयत्ता पाचवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठपुस्तकात दोन विभागामध्ये सोळा प्रकरण व त्याचे… उदाहरणसंग्रह दिलेले आहेत. या पाठपुस्तकात काही पाठांच्या संदर्भात शिक्षकांनी जी भाषा विद्यार्थ्यांसमोर मांडावी अशी अपेक्षा आहे, ती पाठ्यपुस्तकात संवादरूपात दिली आहे. ज्यांचा वापर विद्यार्थ्यांना गणिताच्या अभ्यासात वारंवार करावा लागतो, असे गुणधर्म व नियम चौकटींत दिले आहेत. तसेच, विचार करा, गणिती कोडी, शोधा म्हणजे सापडेल, खेळ यांचा वापर करून गणित विषय मनोरंजक करण्याचा प्रयत्न केला आहे. हे पाठ्यपुस्तक जास्तीत जास्त निर्दोष व दर्जेदार व्हावे, या दृष्टीने महाराष्ट्राच्या सर्व भागांतील निवडक शिक्षक, तसेच काही शिक्षणतज्ज्ञ व विषयतज्ज्ञ यांच्याकडून या पुस्तकाचे समीक्षण करून घेण्यात आले आहे.