Marathi Yuvakbharati class 12 - Maharashtra Board: मराठी युवकभारती इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड
Audio avec voix de synthèse
Résumé
मराठी युवकभारती इयत्ता बारावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात सहा विभाग आहेत. पहिल्या दोन विभागातील… गद्य-पद्यपाठांच्या माध्यमातून नामवंत साहित्यिकांच्या साहित्यिक कृतींचा परिचय करून घेता घेता त्या साहित्यांमधील संस्काराने भाषा ही उत्तरोत्तर समृद्ध होत जाईल. हे साहित्य तुमच्या वैचारिक आणि कल्पनाशक्तीच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल. या साहित्यामधील आशय तुम्हांला आजच्या जीवनातील समस्यांची जाणीव करून देईल तसेच साहित्यिक कृतींमधील सौंदर्याचा आनंद घेत आपले जीवन अनुभवसमृद्ध करण्याचा वस्तुपाठही तुम्हांला मिळेल. चित्रांमुळे पाठ्यपुस्तकाचे स्वरूप अधिक आकर्षक झाले आहे. त्यामुळे आशयाचे आकलन अर्थपूर्ण आणि सुलभ होण्यास मदत होईल.