
Paryatan Bhugol 2 TYBA Sixth Semester - SPPU: पर्यटन भूगोल 2 टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
Synthetic audio
Summary
पर्यटन भूगोल 2 या पुस्तकात प्रकरण एकमध्ये पर्यटनातील निवासस्थानाची भूमिका या प्रकरणात निवासस्थानाचे प्रकार यामध्ये हॉटेल, मोटेल, पथिकाश्रम, खाजगी व शासनमान्य निवासस्थाने तसेच निवासव्यवस्थेची भूमिका या बाबींचा समावेश केलेला आहे. प्रकरण दोनमध्ये पर्यटनाचे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरणीय परिणाम यांचे… सखोल स्पष्टीकरण केलेले आहे. तसेच शाश्वत विकासात पर्यटनाची भूमिका व धोरण याचाही अभ्यास केलेला आहे. प्रकरण तीनमध्ये पर्यटन विकासाचे नियोजन आणि धोरणे यामध्ये जागतिक पर्यटन संघटना (UNWTO), भारतीय पर्यटन विकास महामंडळ (ITDC) आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) या सर्वांचे विस्तृत विवेचन केलेले आहे. प्रकरण चारमध्ये पर्यटन स्थळांचे अध्ययन यामध्ये मनाली व महाबळेश्वर ही थंड हवेची ठिकाणे, ताजमहाल व रायगड किल्ला तसेच काझीरंगा व मेळघाट ही राष्ट्रीय उद्याने या सर्व स्थळांचे अध्ययन विस्तृतपणे केलेले आहे. 'पर्यटन भूगोल 2' या पुस्तकात वरील सर्व मुद्द्यांनुसार पर्यटन स्थळांचे वर्णन केले असल्यामुळे विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, पर्यटन मार्गदर्शक या सर्वांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.