Paryatan Bhugol TYBA Fifth Semester - SPPU: पर्यटन भूगोल टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
Audio avec voix de synthèse
Résumé
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या टी. वाय. बी. ए. या शैक्षणिक वर्षासाठीच्या अभ्यासक्रमात सेमिस्टर पॅटर्न अवलंबण्यात आला आहे. भूगोल (G-3) (पर्यटन भूगोल -१) या पेपरच्या अभ्यासक्रमात सुचविण्यात आलेल्या सुधारणांची अंमलबजावणी जून २०२० पासून होत आहे. हे पुस्तक आपत्ती व्यवस्थापनावर प्रकाश टाकणारे… एक उपयुक्त पुस्तक आहे. पुस्तकाच्या सुरूवातीला पर्यटन आणि पर्यटक या संकल्पना स्पष्ट करण्यात आल्या आहे. पर्यटनाचे स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तसेच भूगोलाघी पर्यटन विकासात असणारी भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. पुस्तकाच्या दुसऱ्या प्रकरणात पर्यटन विकासास प्रभावित करणाऱ्या घटकांचा आढावा घेण्यात आला आहे. त्या अनुशंगाने प्राकृतिक घटक, सामाजिक सांस्कृतिक घटक आणि राजकीय घटक पर्यटनास कशाप्रकारे प्रभावी ठरतात हे जाणून घेण्यात आले आहे. तिसऱ्या प्रकरणात पर्यटनाचे व पर्यटकांचे वर्गीकरण देण्यात आले आहे. राष्ट्रीयत्वानुसार, पर्यटन कालावधीनुसार आणि पर्यटनाच्या उद्देशानुसार पर्यटकांचे असणारे प्रकार स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच पर्यटनासंदर्भातील विविध संकल्पनांचा आढावा घेण्यात आला आहे. त्या अनुशंगाने कृषी पर्यटन, पर्यावरण पर्यटन, वन्यजीव पर्यटन, निरोगी पर्यटन, आरोग्य पर्यटन आणि क्रीडा पर्यटन या संकल्पना आणून घेण्यात आल्या आहे. पुस्तकाच्या शेवटी पर्यटन विकासात वेगवेगळ्या वाहतूक साधनांची आणि संदेशवहनाची असणारी भूमिका अभ्यासण्यात आली आहे. एकूणच पर्यटन भूगोलातील अभ्यास घटकांची विश्लेषणात्मक माहिती देणारे हे एक उपयुक्त पुस्तक आहे.