
Gramin Vikasacha Bhugol 2 Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: ग्रामीण विकासाचा भूगोल 2 पेपर 3 टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पु
Synthetic audio
Summary
'ग्रामीण विकासाचा भूगोल भाग 2' या विषयाची माहिती संशोधनात्मक दृष्टिकोनातून अद्ययावत देण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केलेला आहे. ज्या प्रदेशात आपण राहतो त्या आसपासची अद्ययावत माहिती व्हावी हा एक महत्त्वाचा उद्देश हा विषय सुरू करताना आहे. हे पुस्तक विद्यार्थी, शिक्षक, संशोधक,… भूगोलप्रेमी, पर्यावरणप्रेमी, अभ्यासक अशा सर्वांनाच होईल यात शंका नाही. म्हणूनच दुसऱ्या प्रकरणात समस्याप्रधान क्षेत्रांना डोळ्यांसमोर ठेवून विकासाच्या दिशांवर चर्चा केलेली दिसून येते. आपला देश आपल्या राज्यघटनेनुसार समानता मानणारा आहे. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर आपण 'कल्याणकारी' राज्याची संकल्पना मान्य केलेली आहे. म्हणूनच शासनातर्फे तळागाळातल्या लोकांना वर आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावा लागतो. तो कशा प्रकारे केला जातो, यासाठी शासनाच्या कोणत्या योजना आहेत इत्यादींची सविस्तर माहिती तिसऱ्या प्रकरणात दिसून येते. चौथ्या प्रकरणात ग्रामीण विकासाबाबत झालेल्या किंवा चालू असलेल्या प्रयत्नांचा चिकित्सात्मक अभ्यास स्पष्ट केलेला आहे. त्यासाठी 'क्षेत्रीय अभ्यास पद्धती' अवलंबलेली आहे. याचाच अर्थ एखाद्या गावाच्या, गटाच्या किंवा समूहाच्या विकासाचे प्रयत्न अभ्यासणे हा होय. यात योग्य उदाहरणे निवडून त्याबाबत साधकबाधक चर्चा केलेली दिसून येते. सर्व प्रकरणांच्या शेवटी प्रश्नसंच दिलेला असल्याने विद्यार्थ्यांना आपल्याला कितपत ज्ञान प्राप्त झाले आहे हेही पडताळून पाहता येईल.