Swapna Chalun Aale: स्वप्न चालून आले
Audio avec voix de synthèse, Braille automatisé
Résumé
स्वप्न चालून आले! अरे, व्वा! शाब्बास. थोडा उशीर झाला असेल पण अखेर तुम्ही सुद्धा ह्या विषयाकडे वळलातच. अहो, कोणता विषय काय विचारता ? प्रेमाचा विषय. अनादी काळापासून ते अनंत काळापर्यंत सदा सर्वकाळ मनुष्य जातीसाठी जाज्वल्य असणारा विषय म्हणजे प्रेम. आपली… ही एक मस्त मधुर, चटकदार आणि यशस्वी अशी प्रेम कहाणी असावी असं प्रत्येकाला वाटत असतं. लग्नाआधी असो किंवा लग्नानंतर पण ज्यांची प्रेम कहाणी यशस्वी होते ते नशीबवान लोकं आयुष्य खऱ्या अर्थाने अनुभवतात. ज्यांची होत नाही त्यातले काही जण प्रेम कहाणी लिहितात आणि काही आयुष्य भर त्या प्रेमाची प्रतीक्षा करत राहतात. काहींचा इतका ही संयम नसतो म्हणून त्यांचा प्रेमावरून विश्वासच उडतो. त्यांना दुसरी व्यक्ती म्हणजे फक्त वासना पूर्तीच साधन वाटतं. फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक वासना सुद्धा. सरते शेवटी उरतात ती लोकं ज्यांच्यात संयम असतो पण कायमच प्रेमाला मुकलेले असतात. अशा लोकांच्या डोळ्यात सतत प्रेम मिळवण्याची तळमळ दिसते… पण प्रेम असं कधी मिळवता येतं का? प्रेम तर फक्त करता येतं. देता येतं. उधळता येतं. प्रेम फक्त एक भावना किंवा एक घटना नव्हे तर तो एक सतत चा प्रवास आहे. स्वतः पलीकडं जाण्याचा प्रवास . स्वत्वाच्या सीमा तोडून आपल्या सर्वस्वाची उधळण दुसऱ्या अंतरंगावर करत राहण्याचा प्रवास. अंतरंगा द्वारे अनंत मिळवण्याचा प्रवास. ही कहाणी म्हणजे असाच एक गोड गुलाबी आणि गुलजार प्रवास आहे. गायत्री, महेंद्र, श्रुती, वेदांत, गिरिजा, सुजय आणि संचिता यांच्या अंतरंगाचा…