Samajik Vaad: सामाजिक वाद
Audio avec voix de synthèse, Braille automatisé
Résumé
आज त्या जगापुढें सर्वांत महत्त्वाचा प्रश्न कामकरीवर्गाचा आहे. तिकडे हा वर्ग अठराव्या शतकांत यांत्रिक कारखान्यांच्या उत्पत्तीनंतर अस्तित्वांत आला. पहिल्यापासूनच त्याची स्थिति परवश, जुलुमानें गांजलेले, दीन, दरिद्री व कष्टमय राहत आली. शिक्षणाच्या व जागृताच्या अभावी त्यानें ती बरीच वर्षे निमूटपणें सहन… केली. या पुस्तकांत सामाजिक वादाचा इतिहास देण्याचाच उद्देश असल्यानें, त्या वादांत अगदीं प्रारंभापासून आतांपावतों होत आलेल्या निरनिराळ्या रुपांतरांचें व मतांतराचें केवळ विवेचन मात्र यांत करण्यांत आलें आहे. या मतांवर घेतले जाणाऱ्या आक्षेपांचा किंवा त्यांना देण्यांत येणाऱ्या उत्तरांचा यांत विचार केलेला नाहीं.