
Tattvadnyan class 11 - Maharashtra Board: तत्त्वज्ञान इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड
Synthetic audio
Summary
तत्त्वज्ञान इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पुस्तकात तत्त्वज्ञानाच्या जगभरात असलेल्या वेगवेगळ्या परंपरांपैकी भारतीय आणि… पाश्चात्य या दोन परंपरांची ओळख करून दिलेली आहे. यामधून तत्त्वज्ञानाचा संस्कृतीशी, ऐतिहासिक कालखंडांशी कसा संबंध असतो हे स्पष्ट केलेले आहे. पुस्तकामध्ये पाठांतरापेक्षा आकलन आणि उपयोजन यांच्यावर भर देण्याच्या हेतूने स्वाध्याय, आणि उपक्रमांची रचना केली आहे. पुस्तकातील विषयांशी संबंधित माहिती इतर स्रोतांमधून शोधणे, तिची योग्य मांडणी करता येणे, संवाद-चर्चा, लेखन आणि इतर सृजनशील पद्धतींनी आपले विचार व्यक्त करता येणे, त्याचबरोबर केवळ लेखन-वाचन या रूढ पद्धतीच नव्हे, तर प्रत्यक्ष निरीक्षण, चित्रे बघणे, संगीत ऐकणे, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळणे या प्रकारेही तत्त्वज्ञान शिकवले गेलेले आहे.