
Arthashastra class 11 - Maharashtra Board: अर्थशास्त्र इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड
Synthetic audio
Summary
अर्थशास्त्र इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. पाठ्यपुस्तकामध्ये दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या अर्थशास्त्रीय संकल्पना उदाहरणार्थ, पैसा,… आर्थिक वृद्धी व विकास, आर्थिक सुधारणा, आर्थिक नियोजन, संख्याशास्त्र इत्यादींचा ऊहापोह करण्यात आला आहे. या पाठ्यपुस्तकाची मांडणी ही अर्थशास्त्रीय भाषेशी कोणतीही तडजोड न करता सोप्या व साध्या भाषाशैलीचा वापर करून केली आहे. अर्थशास्त्राच्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी आवश्यक तेथे विविध चित्राकृती, आलेख, तक्ते इत्यादींचा वापर केला आहे. अर्थशास्त्र विषयातील अवघड संकल्पना, शब्द यांसाठी पाठ्यपुस्तकाच्या शेवटी परिशिष्टही देण्यात आले आहे.