
Bhugol class 11 - Maharashtra Board: भूगोल इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड
Synthetic audio
Summary
भूगोल इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात प्राकृतिक भूगोलाचा समावेश केला आहे, पृथ्वीच्या विविध… भागात प्राकृतिक घटकांचे वितरण पाहायला मिळते. वैविध्यता व असमानता आढळते, विशिष्ट प्रारूप, त्याचे वर्णन व विश्लेषण करणे त्यावर आधारित भविष्यकालीन घटनांचा अंदाज बांधणे, शास्त्रीय मीमांसा करणे यांचेही ज्ञान या अभ्यासातून मिळते. आधुनिक बदल व त्यांचे महत्त्व जाणून घेणे. प्रात्यक्षिक भूगोलातही कालानुरूप बदल केले आहेत, ते तुम्हाला अद्ययावत तंत्राशी जुळवून घेण्यास उपयुक्त ठरतील. भूगोल हे निरीक्षणावर भर देणारे शास्त्र आहे असे म्हटले जाते. या विषयात निरीक्षण, आकलन, चिकित्सक विचार, विश्लेषण इत्यादी कौशल्ये महत्त्वाची आहेत.