
Itihas class 11 - Maharashtra Board: इतिहास इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड
Synthetic audio
Summary
इतिहास इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकामध्ये १०००० वर्षांहूनही अधिक अशा अत्यंत प्रदीर्घ कालखंडाचा… इतिहास सामावलेला आहे. इसवी सनपूर्व ८०००-७००० च्या सुमारास भारतीय उपखंडामध्ये विविध ठिकाणी प्राथमिक अवस्थेतील शेतीची सुरुवात झाली. या काळापासून सुरुवात करून मध्ययुगीन इतिहासापर्यंतची सुसूत्र मांडणी या पुस्तकात केलेली आहे. एवढ्या प्रदीर्घ कालखंडातील सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाच्या वाटचालीची मांडणी भारताच्या संदर्भात करत असताना, प्रत्येक पाठ त्या वाटचालीतील एकेका टप्प्याचा प्रातिनिधिक ठरावा अशा पद्धतीने पाठांची रचना केलेली आहे. अर्थातच या पद्धतीच्या मांडणीमध्ये ऐतिहासिक कालक्रम आधारभूत असला तरी त्यामागील संकल्पनात्मक आणि प्रक्रियात्मक साखळी स्पष्ट करण्यावर अधिक भर देण्यात आला आहे.