
Shapath Vayuputranchi: शपथ वायुपुत्रांची
Audio avec voix de synthèse, Braille automatisé
Résumé
"The Oath Of The Vayuputras" या पुस्तकाचा मराठी अनुवाद. शिव आपल्या सैन्याची जुळवाजुळव करत आहे. तो पंचवटी या नागांच्या राजधानीत जातो आणि अखेरीस त्याला सैतानाचा शोध लागतो. ज्या पुरुषाच्या नुसत्या नावानेच बलाढ्य योद्ध्यांनाही कापरे भरते, त्या आपल्या खऱ्या शत्रूच्या विरोधात… पवित्र युद्ध करण्यासाठी नीळकंठ तयारी करतो. तुंबळ युद्धांच्या मालिकेच्या उद्रेकाने भरतवर्ष हादरून जातो. कित्येक जण मृत्यू पावतात. मात्र कितीही किंमत मोजावी लागली तरीही शिवाला कदापि अपयश येता कामा नये. त्याला ज्यांनी कधीच साहाय्य देऊ केलेले नसते, त्या वायुपुत्रांकडे तो अत्यंत नैराश्यग्रस्त परिस्थितीत जातो. तो यशस्वी होतो का? आणि सैतानाला प्रतिबंध करण्याची खरी किंमत कोणती असते? भरतवर्षासाठी ती काय असते? आणि शिवाच्या आत्म्याला कोणती किंमत मोजावी लागते? उत्तम खपाच्या शिवावरील तीन पुस्तकांच्या मालिकेतील या तिसऱ्या पुस्तकात या गूढ प्रश्नांची उत्तरे सापडतील.