Reward: रिवार्ड
Synthetic audio, Automated braille
Summary
मराठीतील लोकप्रिय लेखक बाबा कदम यांची गाजलेली कादंबरी Reward. उत्कंठावर्धक नाट्यने भरलेली कादंबरी.एक दिवस असा भयानक उजाडला, की तळाशी हे गाव धरणीकंप झाल्यासारखं हादरलं. गेल्या कित्येक वर्षांत या भागात जे घडलं नाही, ते घडलं! त्या दिवशी खून झाला आणि तोही… तातोबाचा.त्या दिवशी दुपारी चारच्या सुमारास गुराख्याची मुलं माथाडीजवळ जनावरांना पाण्यावर घेऊन गेली होती. त्यांना अचानक ठो… ठो…ऽऽऽ असा आवाज आल्यामुळं भयभीत होऊन त्यांनी इकडंतिकडं पाहिलं, तर समोरून उंबराच्या झाडामागून तातोबा वेड्यासारखा धावत त्यांच्यासमोर आला आणि धाडकन जमिनीवर कोसळला. त्याच्या गालातून आरपार अशी बंदुकीची गोळी गेली होती आणि त्याची संपूर्ण जीभ तुटली होती. ओठ आणि नाकपुड्या रक्तानं माखलेल्या होत्या.